बलात्कारी फमईला अखेर ७३ दिवसांनी दिली फाशी! चार वर्षीय पीडितेला मिळाला न्याय!
27-Jul-2023
Total Views | 898
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला ७३ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने दुष्कृत्य केल्यावर पीडितेची हत्या केली होती आणि आरोपी पीडितेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान पीडितेच्या नातेवाइकांनी आरोपीच्या घरातून मुलीचा मृतदेह मिळाला. २३ एप्रिल रोजी आरोपी फईमने पीडितेसोबत हे दुष्कृत्य केले होते.
जहांगीराबाद कोतवाली परिसरात २३ एप्रिल रोजी घराबाहेर खेळत असलेली चार वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. खूप शोध घेतल्यानंतर घरच्यांना कळलं की शेजारी राहणारा फईम तिला घरी घेऊन गेला होता. नातेवाईक व इतर लोकांनी आरोपीच्या घरी जाऊन मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह पलंगाखाली पडलेला आढळून आला.
त्या मृतदेहाला फईम रात्री लपण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याचवेळी घटनेच्या ७३ दिवसांनंतर एडीजे स्पेशल पोक्सो ध्रुव राय यांच्या कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.