नगर : इन्स्टाग्रामवरुन तरुणीचे धर्मांतरण! पाच मौलवींवर गुन्हा दाखल

    13-Jul-2023
Total Views | 61

Conversion  
 
 
नगर : मध्यप्रदेश इंदौरमध्ये सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी मोबाईलवरुन कोपरगावात एका वास वर्षीय तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एका वर्षाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपी सायम कुरेशी याने पीडित तरुणी आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची घमकी दिली. तरुणीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली.
 
तरुणीला बळजबरीने तिच्याच मोटरसायकलवर ट्रीपल सिट बसून कोपरगाव जवळील मदरशात घेऊन गेले. तिथे आरोपींनी तिच्यावर शरीरसंबंध केले. त्याचे फोटो, व्हिडीओ तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, इंदौरयेथील एका मौलवीकडून बळजबरीने नमाज पठण करण्यास लावले. यानंतर त्यांनी सायमबरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला.
 
या संपूर्ण घटनेनंतर सायम कुरेशी आणि कोपरगावातील इमरान अयुब शेख, कलिम व इंदौरयेथील मौलवी अशा पाच जणांविरुध्द कोपरगाव शहर पेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाकी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना झाली असे, तपास अधिकारी भरत दाते यांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121