मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष :राहुल गांधींची मुक्ताफळे

मुस्लिमबहुल मतदारसंघातून निवडून येण्यासाठीच हा आटापिटा :केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

    02-Jun-2023
Total Views | 105
Congress Leader Rahul Gandhi On Muslim League

नवी दिल्ली
: मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षामध्ये बिगरधर्मनिरपेक्ष असे काहीही नाही, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत उधळली आहेत. अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना काँग्रेस पक्ष आणि केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्या आघाडीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यास राहुल गांधी यांनी उत्तर देऊन मुस्लिम लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा अजब दावा केला. ते म्हणाले, मला वाटते की हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने मुस्लिम लीगबद्दल अभ्यास केलेला नाही. मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्यात बिगरधर्मनिरपेक्ष असे काहीही नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या आघाडीविषयी कोणताही प्रश्न उपस्थित होत नसल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे तेच लोक आहेत जे फाळणीनंतर इथे राहिले. फाळणीनंतर त्यांनी येथे मुस्लिम लीगची स्थापना केली आणि ते खासदार झाले. त्यांनी शरिया कायद्याची वकिली केली, मुस्लिमांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याची त्यांची इच्छा होती. हे तेच लोक आहेत जे त्याच मुस्लिम लीगचा भाग आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस यांना हिंदू दहशतवाद दिसतो पण मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष आहे असे वाटते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मुस्लिम ब्रदरहूड आणि मुस्लिम लीगसारख्या संघटनांच्या बाजूने बोलणे साहजिक आहे. कारण त्यांना अमेठीतून पराभूत झाल्यानंतर मुस्लिमबहुल जागेवरून वायनाडमधून निवडणूक लढवावी लागली आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121