"राजाशी लग्न करेन पण ..."; लग्नापूर्वीच सोनमची आईला धमकी!
11-Jun-2025
Total Views |
इंदोर : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. आता या प्रकरणात राजाचा मोठा भाऊ विपिनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनमने आपल्या आईला राजसोबत असलेल्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितले होते. तिने तिच्या आईला राजा रघुवंशीशी लग्न करण्यासाठी दबाव आणला तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
विपिनने सांगितले की, "सोनमने तिच्या आईला राजसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाबद्दल आधीच सांगितले होते." तिने सांगितले की, "तिला राजाशी लग्न करायचे नव्हते. तरीसुद्धा तिच्या आईने राजसोबतच्या तिच्या नात्याला आक्षेप घेत तिला हे लग्न करण्यास भाग पाडले."
विपिनने असाही आरोप केला की, "सोनमने राजाशी तडजोड करण्यास आणि लग्न करण्यास सहमती दर्शवली परंतु ती म्हणाली की, मी त्या व्यक्तीचे काय करेल ते तुम्हाला दिसेलच. तुम्हाला सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणीही विचार केला नव्हता की ती राजाला मारेल", असे विपिनने म्हटले आहे.
सोनम आणि तिचा प्रियकर राज आणि त्यांच्या तीन साथीदारांनी राजाची हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. हत्या झाली तेव्हा सोनम आणि राजा हे मेघालयात हनिमूनवर होते. इंदोर येथील २४ वर्षीय सोनम आणि २९ वर्षीय राजाचे ११ मे रोजी लग्न झाले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमचे राजशी संबंध असूनही लग्न झाले. राज जो सोनमच्या कुटुंबाच्या मालकीच्या फर्निचर दुकानात नोकर म्हणून काम करत होता. सोनम हत्येनंतर "बेपत्ता" झाली होती, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे असल्याने तिने तिच्या पतीपासून सुटका करून घेण्यासाठी प्रियकर व भाडोत्री गुंडाच्या मदतीने ही हत्या केली. असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, "सोनमने हत्या करण्यासाठी आरोपींना २० लाख रुपये दिले होते"