राम चरणने केली 'द इंडिया हाऊस' चित्रपटाची घोषणा!'द काश्मीर फाइल्स'च्या....

    28-May-2023
Total Views | 947
abhishek-agarwal-ram-charan-announce-the-india-house-movie-nikhil-siddhartha-anupam-kher

नवी दिल्ली : 'द काश्मीर फाइल्स' आणि 'कार्तिकेय २' चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी तेलुगू चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेते राम चरण यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्या दोघांनी मिळून नवीन चित्रपट तयार करण्याचे ठरवले आहे. तो चित्रपट भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असेल. या चित्रपटाचे नाव 'द इंडिया हाऊस' असे असेल, ज्यामध्ये निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाच्या टायटल अनाऊंसमेंटचा व्हिडीओही रिलीज झाला आहे, ज्याला खूप पसंती दिली जात आहे.

या चित्रपटाची घोषणा होताच राम चरण यांनी समाजमाध्यमांवर लिहले आहे की, , "आमचे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त, आम्ही आमचा पुढचा चित्रपट द इंडिया हाऊसची घोषणा करतो." राम चरणची कंपनी 'व्ही मेगा पिक्चर्स' आणि अभिषेक अग्रवालची 'अभिषेक अग्रवाल आर्ट्स' संयुक्तपणे हा चित्रपट बनवत आहेत. लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाभोवती चित्रपट फिरत असल्याचे दिसते.

 
या चित्रपटात अनुपम खीर हे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांची भूमिका साकारणार आहेत, तर निखिल सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव 'शिवा' असणार आहे. क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा हे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रवर्तकांपैकी एक होते, ज्यांनी दयानंद सरस्वतींनी दाखवलेल्या मार्गाचा पुरस्कार केला होता. १९०५ मध्ये त्यांनी 'इंडिया हाऊस' आणि 'द इंडियन सोशिऑलॉजिस्ट'ची स्थापना केली.

पुढे हे इंडिया हाऊस क्रांतिकारकांच्या सभांचे प्रमुख ठिकाण बनले. त्यावेळी ब्रिटनमधील भारतीय राष्ट्रवादाचे हे प्रमुख ठिकाण होते. काशीच्या ब्राह्मणांनी त्यांना 'पंडित' ही पदवी दिली होती. ते व्यवसायाने वकील होते. ते वैदिक तत्त्वज्ञानाचेही अभ्यासक होते. इंग्रजांना वारंवार आवाहन करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयांच्या ते पूर्णपणे विरोधात होते. त्याच्यावर आधारित एक नवीन चित्रपट, २० व्या शतकाच्या सुरूवातीस, 'इंडिया हाऊस' कसे जाळले गेले हे दर्शवेल.

यासोबतच स्वातंत्र्यलढ्याच्या गाथेतील एक प्रेमकथाही दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट भारतातील अनेक प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून तो परदेशी भाषांमध्येही बनवला जाणार आहे. त्याचे छायांकन कॅमेरून ब्रायसन सांभाळतील. चित्रपटाशी निगडीत इतर कलाकारांचा तपशील माहिती कालंतराने सार्वजनिक केली जाणार आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यानंतर वीर सावरकर लंडनमधील क्रांतिकारकांचे नेते झाले. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
 


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121