रमेश पतंगे यांचे कार्य भावी पिढीला मार्गदर्शक : पोपटराव पवार

    02-May-2023
Total Views | 46
popatrao

पुणे
: उद्याच्या भविष्यकाळात आपल्या देशासमोर उभ्या राहणार्‍या आव्हानांच्या दृष्टीने नव्या पिढीचे प्रबोधन करण्यासाठी पद्मश्री रमेश पतंगे यांनी बौद्धिक साहित्य निर्माण केले आहे. त्या कार्याचा गौरवच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून केलेला आहे. त्यांच्या लेखनावर प्रत्येक कार्यकर्त्याने चिंतन केले तर त्यातून देशात फार मोठी चळवळ उभी राहू शकते असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. त्यांचा पुणेकरांच्या वतीने गौरव करण्यासाठी आपण मला निमंत्रण दिले हा मी माझाच गौरव मानतो, असेही त्यांनी नमूद केले.

भारत विकास परिषद, पुणे आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त पुणेकर नागरिकांच्यावतीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याच्या निमित्ताने थोर सामाजिक विचारवंत व लेखक रमेश पतंगे यांचा भव्य सत्कार स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे पद्मश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी पवार बोलत होते. पुणेरी पगडी, मानपत्र, शाल आणि पुष्प देऊन पतंगे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर भारत विकास परिषदेचे दत्तात्रेय चितळे, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महेश पोहनेरकर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना रमेश पतंगे म्हणाले, संघ विचारधारेतील कार्यकर्त्यांनी आता बचावात्मक पवित्रा घेऊन वैचारिक मांडणी करणे सोडून द्यावे आणि आवेशपूर्ण आक्रमक पद्धतीने मांडणी केली पाहिजे. समाजात जे जे म्हणून वाईट आहे त्याचा संबंध संघाशी जोडला आणि संघाला बदनाम केले. हा सर्व उद्योग महाराष्ट्रातील पुरोगामी गँगने केला. पण तो पिढी आता अस्तंगत झालेली आहे. संघाबाबत विखारी मांडणी करणार्‍या संस्थासुद्धा आता लयाला चालल्या आहेत असे ते म्हणाले.

डॉ. प्रदीप रावत म्हणाले की, राज्यघटनेतील नव्या भारताची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये भारतीय विचारधारतूनच घेतलेली आहेत. भारतीय राज्यघटना ही दीपस्तंभाप्रमाणे आहे. हिंदुत्वाचा सामाजिक आशय काय आहे. याबाबत स्पष्टता आणून कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे आणि सुपारी घेऊन संघाला बदनाम करणार्‍यांना सणसणतीत उत्तर देण्याचे काम पतंगे यांनी केले आहे. तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ज्यांचे वर्णन देवदुर्लभ कार्यकर्ताम्हणून केले आहे, त्याची प्रचिती आपल्याला पतंगे यांच्याकडून पाहून येते. असागौरवपूर्ण उल्लेख करीत महेश पोहनेरकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ग्राहक पेठेचे मयंकांत पाठक यांनी आभारप्रदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेट्ये यांनी केले.
आपण संविधान साक्षर होण्याची गरज आहे. सामाजिक ऐक्य निर्माण झाल्याशिवाय राष्ट्र उभे राहत नाही. ज्या घरात फूट आहे ते घर टिकू शकत नाही. समाजासमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. बदलत्या काळाचे भान बाळगून आता संघ विचारधारेतील कार्यकत्यांनी नवनवीन प्रश्नांना हात घालून ते सोडविण्यासाठी कार्य करायला हवे. समरसतेचा विचार घेऊन आपण ज्या समाजासाठी काम करतो त्यांच्या सन्मान, सहभागिता आणि सुरक्षा या तीन प्रमुख अपेक्षा आहेत. हे कार्यकत्यांनी जाणून घेतले पाहिजे.
रमेश पतंगे, पद्मश्री
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121