बोक्या सातबंडे’ला दिलीप प्रभावळकरंlच्या आवाजाची साथ

    15-May-2023
Total Views | 58
 
मुंबई : दिलीप प्रभावळकर यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे, व त्यांच्यामधील विवीध अभिनयगुणांना वाव देतील असे सिनेमे व नाटके केली आहेत. मराठी रंगभूमी, मालिका, मराठी हिदी चित्रपट माध्यमातून त्यांनी नावाप्रमाणेच आपला प्रभाव कायम ठेवला आहे. तसेच प्रत्येक वयोगटातील मुलांना, तरूणांना, व अगदी पन्नासी ओलांडलेल्या वृद्धांना रूचेल अशी अलगद फिरकी घेणारे, विपुल साहित्य निर्माण केले आहे. त्यांचा विनोद व अभिनय अगदी त्यांच्यासारखाच आहे साधा, सरळ, हलका फुलका, परंतु जबाबदार. त्यामुळे त्यांची पुस्तके वाचून किंवा भुमिका बघ ून कोणी दुखावले गेल्याचे ऐकिवात नाही. त्यांत भडकपणाला किंवा उगीच जास्त स्पष्टवक्तेपणाला कुठेही जागा नाही. हो पण, तो काही विशिष्ठ व्यक्तींच्या वर्मी घाव बरोबर घालतो!! जीवनातले निरनिराळे प्रसंग व रोज आपल्याला येणारे अनुभव रंजक शब्दांमध्ये व मिश्कील शैलीमध्ये कसे मांडावेत हे त्यांच्या पुस्तकांमधून नक्कीच शिकण्याजोगे असते.
 

dilip bokya 
 
स्वप्नवत अशा वाटचालीमध्ये प्रभावळकरांनी ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत. नाटकांसोबतच त्यांनी ‘चिमणराव’ या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘टुरटुर’ आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या त्यांनी केलेल्या आणखी काही मालिका. यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. टिपरेआबा तर घराघरात लोकप्रिय झाले. चि. वि. जोशी यांच्या अजरामवर चिमणराव गुंड्याभाऊ या पात्रांवर काढलेल्या त्याच नावाच्या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ‘चौकट राजा’,‘सरकारनामा’, ‘एक डाव भुताचा’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. प्रभावळकरांनी जरी मालिका केल्या असल्या तरी त्यांना नाटक आणि चित्रपटात काम करणेचं जास्त भावते. या सगळ्या व्यक्तिरेखांचा एकमेकींशी तीळमात्रही संबंध नसला तरी त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे त्या पडद्यावर साकारण्याआधी व साकारताना घेतली गेलेली अखंड मेहेनत. एखादी मनाजोगी भुमिका हातात आली की तिला किमान पाच सहा वर्षांकरिता तरी यादगार करून ठेवायचं, इतक्या उंचीवर ते तिला नेवून सोडतात. मग ते महाराष्ट्रातल्या चिमुकल्या नातवंडांचे लाडके आबा असोत किंवा मग पुर्ण भारताने डोक्यावर घेतलेले लगे रहो मुन्नाभाई मधले महात्मा गांधी असोत.
 
ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली 'बोक्या सातबंडे' कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती सर्वांनाच माहित आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला 'बोक्या सातबंडे' आता रंगभूमीवर अवतरलेला आहे. पुणे-मुंबईतील बालक अणि पालक यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगाला मुलं दाद देत होती नाटकाच्या शेवटी तर मुले रंगमंचावर आली आणि पालक हौशेने आपल्या मुलासह आनंद लुटताना दिसली. बोक्या सातबंडे या बालनाट्यात दिलीप प्रभावळकर सहभगी झालेत ! रंगमंचावर प्रत्यक्ष ते दिसत नसले तरी ते त्याच्या आवाजातून नाटकात महत्वाची भूमिका निभावतात! नाटकात मोजकेच पण प्रभावी परिणामकारक असे त्यांचे संवाद लक्षणीय ठरतात.
 
निर्माते आहेत दिनू पेडणेकर, रणजित कामत, राहुल कर्णिक, आणि दीप्ती प्रणव जोशी. अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या 'बोक्या सातबंडे' या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत, सहायक दिग्दर्शक-अभिनव जेऊरकर, नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेटची संकल्पना आणि उभारणी केलेली आहे. दृष्य संकल्पना प्रणव जोशी, प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची असून पोस्टर डिझाइन केलंय गौरव सर्जेराव, अॅडडीशनल ग्राफिक कौस्तुभ हिंगणे,फोटोग्राफी भारत पवार,सूत्रधार श्रीकांत तटकरे, प्रोडक्शन मॅनेजर दिनेश चंद्रकांत,वरुणजोशी,नेपथ्यनिर्माण प्रकाश परब आणि मंडळी,रंगमंच व्यवस्था नीरज कळढोने, पुर्वा लांडगे,ओंकार गुरव, लाइट ऑपरेटर मयूर, म्युझिक ऑपरेटर अजय बोराटे, साहस दृश्ये- राकेश पाटील यांची.
 
आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये आहे. त्याच्या जोडीला यश शिंदे, सायली रामदास रामेश्वरी, ओंकार यादव, अंकुश काणे, स्वाती काळे, अमृता कुलकर्णी, सौरभ भिसे, प्रथमेश अंभोरे, आकाश मांजरे, स्नेहा धडवई, सागर पवार, शीवांश दीप्ती प्रणव जोशी आदि कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरतात. पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतोय. नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणार आहे
अग्रलेख
जरुर वाचा
‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121