दंगेखोरांना दणका!, एकूण एक रुपयाची वसुली पोलीस करणार
छ. संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार
07-Apr-2023
Total Views | 223
119
chhatrapati sambhaji nagar riots - File Photo
मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये केलेल्या दंगल प्रकरणी राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. रामनवमीनिमित्त कट्टरपंथींनी धुडगूस घालत एकूण तीन कोटींचे नुकसान केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी एकूण ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजकंटकांनी पोलीसांच्या एकूण १५ गाड्या जाळल्या होत्या. या दगडफेकीत एकूण २०हून अधिक पोलीस जखमीही झाले होती.
खासगी तीन वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी घातली होती. या सर्वांचा युद्धपातळीवर पोलीस शोध घेत आहेत. याच सर्वांकडून आता सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दंड ठोठावून भरपाई वसूल केली जाणार आहे. छ.संभाजीनगरमध्ये दंगलीनंतर (chhatrapati sambhaji nagar riots) कडक बंदोबस्त लावला होता. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. आता सरकार याच दंगलीत झालेले नुकसानही दंगेखोरांकडून वसूल करण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला आहे.