कल्याण :
कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी कोविड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे कोविड लढय़ावरील हे पुस्तक सर्वांसाठी नक्कीच एक प्रेरणास्तोत्र ठरेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.कडोंमपाच्या कोरोना लढय़ावर आधारित गौतम कोतवाल लिखीत कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याणमधील के. सी. गांधी शाळेच्या सी.एम.गांधी ऑडीटोरियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टर, सामाजिक संस्था आणि पालिका अधिकारी आणि कर्मचा:यांच्या मदतीने कशाप्रकारे आरोग्ययंत्रणा उभारून कोविडला हरवले याचे यथार्थ वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. आमदार विश्वनाथ भोईर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे जाईंट सीपी दत्तात्रय कराळे, क डोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डॉ. आरती विजय सूर्यवंशी, माजी सभागृहनेते रवी पाटील, स्थायी समिती माजी सभापती दिपेश म्हात्रे, विकास म्हात्रे, राहूल दामले आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात कोविडचा सर्वात पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत दगावला. मात्र त्यानंतर ही हिंमत न हारता आम्ही तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात जंबो कोविड रुग्णालय उभारून एका ही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेतली. सर्वाधिक रुग्ण असून ही कल्याण डोंबिवलीचा मृत्यूदर मात्र कमी ठेवण्यात आम्हाला यश आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
डॉक्टर आर्मीसाठी कोविड काळ म्हणजे कटू आठवणी
कोविडने आपल्याला भरपूर काही शिकविले आहे. समोर किती ही मोठा शत्रू किंवा संकट असेल तरी आपण सर्वानी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास त्याला नक्कीच हरवू शकतो हा विश्वास कोविडने दिल्याची भावना डॉ. आर्मीचे प्रमुख आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोविड काळात आम्ही हजारो रूग्णांचा जीव वाचवू शकलो याचा नक्कीच आनंद आहे. मात्र त्याच वेळी आमच्यातील काही डॉक्टराचे झालेले निधन हे मनाला चटका लावणारे ठरले आहे असे सांगताना डॉ. पाटील काहीसे भावूक झाले.कोविड काळात दिलेल्या सेवेबद्दल कल्याण नागरी सत्कार समितीतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विजय सूर्यवंशी आणि डॉ. प्रशांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. अशोक प्रधान , बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्र, के. सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन, कल्याण शहर व्यापारी संघटनेचे विजय पंडीत आदी मान्यवर व्यक्तीच्या हस्ते हा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.कोविडशी यशस्वी लढा देत असतानाच शहर विकासासाठी ही आम्ही झपाटल्याप्रमाणो काम करीत होतो. हे केवळ महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा:यामुळे शक्य झाले आहे. कोविडने कडोंमपा प्रशासनाला कामे करण्याची सकारत्मक मानसिकता दिली आहे असे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त आणि तत्कालीन क डोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
----------------------------------------------------------