केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी मराठीतही होणार प्रवेश परिक्षा

    15-Apr-2023
Total Views | 35
crpf-constable-recruitment-exam-will-be-conducted-in-13-regional-languages-approval

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी भाषेत तयार केली जाईल.

या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल. कॉन्स्टेबल जीडी ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये १ जानेवारी २०२४ पासून परीक्षा घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापराला आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121