बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगास तडा

    02-Mar-2023
Total Views | 145
Crack the Shivlinga in Babulnath temple


मुंबई
: मुंबईतील प्राचीन देवस्थान म्हणून ओळख असणार्‍या बाबुलनाथ येथील शिवलिंगास तडा गेला असल्याचे वृत्त आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने सद्यस्थितीत भाविकांना अभिषेक करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे भाविकांत नाराजी व्यक्त होत आहे.

आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार शिवलिंगाला तडा गेला असल्याचे स्पष्ट झाले असून भेसळयुक्त अबीर, गुलाल, भस्म, कुंकू, चंदन, दूध अर्पण केल्यामुळे शिवलिंगास तडा पडल्याची प्राथमिक माहिती या अहवालातून निदर्शनास आली आहे. बाबुलनाथ मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जात असून हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या एका छोट्या टेकडीवर आहे.

कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला असून मागील आठ ते दहा महिन्यांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्यामुळे शिवलिंग खराब होत असल्याचे मंदिराच्या पुजार्‍यांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी मुंबईकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईची टीम येथील पुरातन शिवलिंगाच्या संवर्धनाबाबत सल्ला देणार असून याच महिन्यात हा अहवाल अपेक्षित आहे. बाबुलनाथ मंदिरावर मुंबईकरांची श्रद्धा असून शिवलिंगाबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि ते जतन करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्यात येतील, असेही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121