पवईत तरुणाची आत्महत्या! सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मागणी!

    21-Feb-2023
Total Views | 126
Youth commits suicide in Powai

मुंबई
: पवई आयआयतील दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने जिथे सातव्या मजल्यावरून ऊडी घेत आत्महत्या केली. त्या घटनास्थळाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर निष्काळजीपणाबद्दल आयआयटी प्रशासनाला जबाबदार धरावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.

आयआयटी प्रशासनाविरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे आय आयटी मेन गेट समोर पवई येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजन रिपाइं चे पवई विभागीय नेते बाळ गरूड, विनोद लिपचा, भाऊ पंडागळे यांनी केले तर नेतृत्व रिपाइंचे गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड ,जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव,साधू कटके, दादू भोसले,देविदास गायकवाड, अजित रणदिवे,उर्मिला मिश्रा, सोमा सरकार,मीना पवार , अमिना खान,वर्षा लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येमुळे दलित आदिवासी समाजात दूरगामी परिणाम झाले असून आपल्या हुशार विदयार्थ्यांना आय आय टी सारख्या उच्चशिक्षण संकुलात पाठवायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे अशी खंत गौतम सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121