विक्रमगड : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी विक्रमगड तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी आपुलकीचे नाते दृढ करण्याच्या हेतूने त्यांनी या भेटी घेतल्या.
यावेळी विक्रमगड तालुक्यातील वसुरी, मलवाडा, साखरे, सारशी, तलवाडा अशा विविध गणेशोत्सव मंडळांना खासदार सावरा यांनी भेट दिली. मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली आणि शुभेच्छा दिल्या.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत पालघर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदीप पावडे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाजी काठोळे, भाजप नेते मधुकर खुताडे, महेश आळशी, विक्रमगड मंडळ प्रमुख रवींद्र भडांगे आणि राहुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार सावरा यांच्या भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गणेशोत्सव साजरा करण्याच्या उत्साहात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.