मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दाखवण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी ४० कोटी खर्च करून ३६ जिल्ह्यांत छत्रपती शिवाजी महाराजांवरचे महानाट्य दाखवण्याचे प्रयोजन असून प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त २ जून,२०२३ ते ६ जून, २०२४ या कालावधीत विशेष कार्यक्रमांचे केले जाणार असून संबंधित जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्याला आमंत्रित केले जाणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती सर्वसामान्यांपर्यंत आणि विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावे असे या महानाट्याचे उद्दिष्ट आहे.