'त्या' मिमिक्री प्रकरणी मंत्री लोढांचा निलंबित खासदारांवर घणाघात!

    21-Dec-2023
Total Views | 42

Lodha


मुंबई :
घमंडिया युतीच्या खासदारांचे कृत्य देशासाठी लज्जास्पद आणि अस्वीकारार्ह आहे, असा घणाघात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली होती. याबद्दल मंत्री लोढांनी 'X' वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

 
मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची संसद भवनाबाहेर खिल्ली उडवून त्यांचा अपमान करणे हे देशासाठी लाजिरवाणे आणि अस्वीकारार्ह आहे. एक खासदार खिल्ली उडवत होता तर दुसरा खासदार कॅमेरा घेऊन त्या घटनेचा व्हिडिओ बनवत होता."
 
"ही घटना आम्हां देशवासियांसाठी असह्य आहे. भारतातील जनता या परिवारवादी घमंडिया युतीला नक्कीच उत्तर देईल आणि ते ज्याप्रकारे कॅमेऱ्यांचा गैरवापर करत आहेत, उद्या हेच कॅमेरे त्यांचे वास्तव जगाला दाखवतील," अशी टीका मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121