म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव द्या; कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने मांडला प्रस्ताव, भाजपने केला विरोध!

    16-Dec-2023
Total Views | 58
Proposal to rename Mysuru airport after Tipu Sultan triggers row in Karnataka

बेंगलुरु : कर्नाटकात पुन्हा काँग्रेस पक्षाकडून टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण केले जात आहे. काँग्रेस आमदारांनी विधानसभेत म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रसाद अब्बय्या असे हा प्रस्ताव मांडणाऱ्या काँग्रेस आमदाराचे नाव आहे. हुबळी-धारवाड (पूर्व) मतदारसंघातून ते आमदार आहेत. विधानसभेत या विषयावर बोलताना आमदार प्रसाद अब्बय्या म्हणाले की, “मी म्हैसूर विमानतळाला 'टिपू सुलतान विमानतळ' असे नाव देण्याचा प्रस्ताव मांडतो.”

प्रसाद अब्बय्या यांनी अनेक विमानतळांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडला. प्रसाद पुढे म्हणाले, “आमच्या हुबळी विमानतळासाठी आम्हाला सांगोली रायण्णा असे नाव द्यायचे आहे. आम्हाला बेलागावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी कुवेंपू आणि विजयपूर विमानतळाचे नाव जगज्योती बसवण्णा यांच्या नावावर ठेवायचे आहे.” विधानसभेत ही नावे सर्वांनी मांडल्याचे आमदार आबय्या यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या याची विशेष दखल घेत केंद्र सरकारला शिफारसी पाठवत आहेत.

या प्रस्तावाला भाजपने कडाडून विरोध केल्याने विधानसभेत दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली. टिपू सुलतान हिंदूंसाठी कधीही आदर्श होऊ शकत नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले. टिपू सुलतानचे व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिले आहे. लोक त्याला क्रूर शासक मानतात. या प्रस्तावामुळे टिपू सुलतानच्या चारित्र्याबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. टिपू सुलतानच्या चारित्र्याबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबद्दलचा वाद अधिक तीव्र होऊ शकतो. या वादामुळे कर्नाटकात राजकीय तणाव वाढू शकतो.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121