मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे विचार शिबीर कर्जत येथे आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा ठोकला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात आमचाच पक्ष असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, कर्जत येथील विचार शिबीरात अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे विरोधकांना पळताभूई थोडी झाली आहे. अजित पवार पुढे म्हणाले, मी जरी त्याकाळी प्रांताध्यक्ष किंवा संघटनेचा पदाधिकारी झालेले नसलो, तरी संघटनेची कामे कोण करत होते, हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विचार शिबीर दि. १ डिंसेबर रोजी झाले. निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, हे ह्या शिबिराचे घोषवाक्य असून ह्या विचार शिबीरात अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे विरोधकांवर टीकेची झोड उठवत अनेक गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले.