"८ नौदल अधिकाऱ्यांविषयी सहानभूती दाखवू नका"; जफरुल इस्लाम खान यांचे वादग्रस्त विधान
01-Nov-2023
Total Views | 297
नवी दिल्ली : "कतारने ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा दिली आहे, त्यांच्याप्रती सहानुभूती नसावी. त्यांच्या बचाव करण्यापूर्वी भारत सरकारने योग्य तपास केला पाहिजे." असे धक्कादायक विधान दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी केले आहे.
जफरुल इस्लाम खान यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हेरगिरीच्या अप्रमाणित आरोपांमुळे माजी भारतीय नौदलाच्या अधिकार्यांना फाशीची शिक्षा भोगावी लागत असताना, जफरुल इस्लाम खान यांनी भारतीय नौदल अधिकाऱ्यांवरच आरोप केले आहेत.
तथापि, दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या माजी अध्यक्षांनी भारताच्या हितापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल २०२० मध्ये, त्यांनी कुवेतचे "कट्टरवाद्यांसोबत उभे राहिल्याबद्दल" आभार मानण्यासाठी एक चिथावणीखोर पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.