वानखेडेवर सचिनचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'; 'एमसीए'कडून कारकीर्दीचा यथोचित गौरव

मुख्यमंत्री आणि एमसीए अध्यक्षांकडून सचिनच्या पुतळ्याचे उद्घाटन

    01-Nov-2023
Total Views | 62
Sachin Tendulkar Statue At Wankhede Stadium Mumbai

मुंबई :
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्या स्टेडियमवर सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतला शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला तेथेच सचिनच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने बुधवार, ०१ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा पार पडला. स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडजवळ सचिनचा पुतळा बसवण्यात आला आहे. हा पुतळा त्याच्या अविस्मरणीय क्रिकेट कारकिर्दीला समर्पित केला आहे.
 

तसेच, या अनावरण सोहळ्याला सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही उपस्थित होते. सचिनच्या दोन दशकांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर २०० वी आणि शेवटची कसोटी खेळली.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकातील सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्याच्या आदल्या दिवशी सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.
 
कसा आहे नेमका सचिनचा पुतळा

वानखेडे स्टेडियमवर अनावरण करण्यात आलेल्या सचिनच्या पुतळा हा त्याचा प्रसिद्ध स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारत असतानाच्या प्रतिकृती स्वरुपात आहे. तसेच, सचिन तेंडूलकर हा फटका खेळताना दिसतो आहे. विशेष बाब म्हणजे, याच वर्षी एप्रिल महिन्यात सचिन तेंडुलकरने आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. तेव्हाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याचा पुतळा उभारण्याचा ठराव संमत केला होता.

अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी या पुतळ्याला मूर्त स्वरुप दिले आहे. एमसीएकडून सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीला मानवंदना देण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले. आणि त्याचवेळी सचिनचा पुतळा इथं उभा राहिला आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी सचिन आणि त्याचे कुटुंबीय होते. शिवाय भारत आणि श्रीलंकेचे क्रिकेट संघ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे आणि अजिंक्य नाईक असे मान्यवर हजर होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121