आर्थिक नियोजन सर्वोपरी

    04-Oct-2023
Total Views | 22
Financial Planning
 
 
आर्थिक नियोजन सर्वोपरी
 

मोहित सोमण
 

आर्थिक बचत ही भविष्यातील आर्थिक तरतूद असते. सुरूवातीला योग्य नियोजन केल्यास बचत हीच पूंजी गुंतवणूक ठरू शकते‌.वर्ल्ड फायनान्शिअल प्लांनिंग डे च्या निमित्ताने.....
 
 
 
आज वर्ल्ड फायनान्शिअल डे असल्याने जागतिक स्तरावर अर्थ नियोजन किती महत्वाचे आहे ते अधोरेखित करणारा हा दिवस. आर्थिक स्वातंत्र्य हा स्त्री असू द्या किंवा पुरुष दोघांनाही उपयोगात पडत. आर्थिक नियोजनाशिवाय लोकांचा आणि लोकांशिवाय राष्ट्रांचा गाडा कसा चालेल ? याच स्वावलंबी तत्वांवर आधारलेल्या छोट्या छोट्या क्लुप्त्या कामाला येतात. The International Organisation of Securities Commissions ( IOSCO) च्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो.
 
 
 
 
१) गुंतवणूकीची विविधता - गुंतवणूक करताना अनेक बाबतीत विचार करणे आवश्यक आहे. निदान आर्थिक जोखीम स्वीकारण्याची तयारी असल्यास यांचे पुढील नियोजन करणे सोपे पडते. कुठल्याही एका प्रकारचा गुंतवणूकीवर अवलंबून न राहता स्वतःचा विस्तृत पोर्ट फोलियो बनवल्यास यांचा निश्चितच फायदा होऊन रिस्कचे प्रमाण देखील संख्यात्मक तुलनेने कमी होते. शेअर मार्केट, म्युच्यअल फंड,फॉरेक्स, कमोडिटी, एस आय पी, डि़बेंचर, बाँड अशा विविध इन्स्ट्रुमेंट मध्ये केल्यास माफक रिस्क घेऊन नफा कमावला जाऊ शकतो.
 
 
 
२) फंड मॅनेजमेंट - फंड मॅनेजमेंटचा विचार लक्षात घेऊन आधीच नियोजन केल्यास खूप काही साध्य करता येऊ शकते. उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा प्रगतीमुळे आपल्या मोबाईलवरील फायनान्स मॅनेजमेंट अँप डाऊनलोड केल्यास आपल्या निधीचा लेखाजोखा ठेवणे शक्य होते. आलेला पैसा कुठे कशावर खर्च होतो कितीचा खर्च, कितीची बचत, सेव्हिंग, त्यांचा विनिमय करून गुंतवणूकीसाठी नियोजन करून कुठे कशी गुंतवावी यांचा योग्य अंदाज आपल्याला येऊ शकतो.
 
 
 
३) देय थकबाकी व इक्विटी यांच्यात समतोल - कुणाला कितीचे देय असल्यास किती रूपयांची इनव्हेसमेंट करता येऊ शकते यांचे अचूक प्रमाण कळते. प्रसिद्ध असलेल्या ६०:४० फॉर्म्युला वापरून भविष्याची तरतूद होऊ शकते. समजा ४० टक्के देय असल्यास ६० टक्के इक्विटी जमवणे आवश्यक असते.
 
 
 
४) भविष्यातील खर्चाची तरतूद - भविष्यातील निश्चित खर्चाची रक्कम बाजूला करुन राहिलेल्या पैशाचे एसआयपी ( Systematic Investment Plan) केल्यास दरमहा ठराविक रक्कम जमा करत एकगठ्ठा रक्कम भविष्यात मिळू शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121