C-DAC Recruitment 2023 : विविध पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू

    04-Oct-2023
Total Views |
Center for Advanced Computer Development Recruitment

मुंबई :
"प्रगत संगणक विकास केंद्र" (सीडीएसी) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "प्रगत संगणक विकास केंद्र" अंतर्गत विविध पदांच्या एकूण २७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

'सीडीएसी'मधील “प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट/कनिष्ठ फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर/फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्य कर्मचारी, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड्स/निर्माते. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी” ही सर्व पदे भरली जाणार आहेत.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ असेल. तसेच, या रिक्त पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121