आशिया सिक्युरिटीज फोरमची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत संपन्न
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना यावेळचे यजमानपद. सिक्युरिटी व अर्थविश्वातील विस्तृत चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित
मुंबई: एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम (BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम (ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल,बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या चर्चच्या निमित्ताने आशिया व आशियाई देशाबाहेरील देखील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन किशोर कंसागरा, एनएससी मुख्य संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, बीएसीचे संचालक सुंदरामन रामामूर्ती, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजच्या संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी लतिका कुंडू, सेंट्रल डिपोझिटरी सर्विसेसच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नेमले वोरा, नॅशनल सिक्युरिटीज डिपोझिटरी लिमिटेडच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मजा चुंद्रू इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री किशोर कंसागरा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन यांनी, ' द आशिया सिक्युरिटीज फोरम हा सिक्युरिटी असोसिएशन व रेग्युलेटरी संस्थांना एकत्रित आणण्याचे महत्वाचे व्यासपीठ आहे. आंतरराष्ट्रीय संस्कृतीतील विविधता, विविध भौगोलिक परिस्थिती यापलीकडे सगळ्यांना एकत्रित आणण्याचे काम हे व्यासपीठ करत विविध वित्तीय प्रश्न सोडवून आर्थिक विश्वाची प्रगती करण्यास हे व्यासपीठ मदत करत आहे. आज आम्हाला याचे यजमानपद भूषवताना अत्यंत आनंद होत असून जगातील विविध मान्यवर प्रतिनिधी उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. ज्यात जर्मनी, ताईवान, युनायटेड किंग्डम, विएतनाम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, हाँगकाँग,मंगोलिया,रशिया या देशातील सदस्य आले आहेत. यापुढे आर्थिक विश्वात समावेशकता व प्रगतीसाठी या व्यासपीठावर चर्चा होते. सगळ्या उपस्थितांचे, वक्ते, भागीदार, प्रसारमाध्यमांना धन्यवाद द्यायचे आहे. हे क्षेत्र लवचिक, स्पर्धात्मक व दुरदृष्टीने प्रगत करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावू.' असे म्हणाले.
यावेळी बोलताना तोशिओ मोरिटा चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी जपान सिक्युरिटीज डिलर असोसिएशन (जेएसडीए) यांनी आपले गौरवोद्गार काढताना, 'आज २८ तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहण्याचे सौभाग्य आम्हाला प्राप्त झाले. जपान सिक्युरिटीज डिलर असोसिएशनच्या वतीने आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आम्हाला आमंत्रण देत आदरतिथ्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. या बैठकीचे अतीव महत्व असून जगभरातील व आशियाई अग्रणी वित्तीय क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नांवर व अर्थ क्षेत्रात प्रगतीसाठी चर्चा करतात. यातून आम्हा सगळ्यांचीच प्रतिबद्धता स्पष्ट होते.' एएसफ आशियातील सिक्युरिटी संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडते.' असे म्हणाले.
Bombay Stock Exchange (BBF) ही कॅपिटल मार्केटमधील विना नफा मध्यस्थ असणारी जुनी संस्था ओळखली जाते. सद्यस्थितीत बीएसीचे देशभरात ६५० हून अधिक सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिक्युरिटी व अर्थविश्वातील ज्ञानाचे आदान प्रदान करण्यात बीएसीचा सहभाग असतो. आशिया सिक्युरिटीज फोरम (ASF) ही जपान डिलर सिक्युरिटीज डिलर असोसिएशनची संस्था असून याचेही आशिया पॅसिफिक क्षेत्रात सदस्य आहेत.
या चर्चेत पारंपरिक डिपोझिटरी, ब्रोकर्स फोरम संबंधित प्रश्नांव्यतिरिक्त ग्रीन फायनान्सिंग,डी कार्बनायझेशन, फिनटेक अशा विविध विषयांवर यावेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.