बांग्लादेशमध्ये भीषण अपघात! दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या
24-Oct-2023
Total Views | 114
मुंबई : बांग्लादेशमध्ये सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी दोन ट्रेनची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. एका मालगाडीने पॅसेंजर ट्रेनला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात जवळपास २० जणांचा मृत्यू झाला असून असंख्य लोक जखमी झाले आहेत.
मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये धडक होऊन हा अपघात घडला आहे. ढाकापासून ८० किलोमीटरवर असणाऱ्या भैरव रेल्वे स्थानकावर हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अपघातात आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच अनेकजण बोगींमध्ये अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रेनच्या डब्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.