"इस्रायलने युद्ध थांबवावे. अन्यथा, अणुबॉम्ब..."; पाकिस्तानच्या महिला खासदाराची धमकी
17-Oct-2023
Total Views |
मुंबई : हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलच्या दीड हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही पाकिस्तानसारख्या कट्टरवादी मानसिकतेच्या देशांनी हमासचे समर्थन केले आहे. याच दरम्यान आता एका पाकिस्तानी महिला खासदाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खासदार इस्रायलचा अणुबॉम्ब टाकून नष्ट करण्याची धमकी देताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला खासदार म्हणते की, "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत. आमचा अणुबॉम्ब मुस्लिमांच्या रक्षणासाठी आहे. आम्ही आमच्या पंतप्रधानांना आवाहन करतो की, इस्रायलला गाझामधील पॅलेस्टाईनविरुद्धचे युद्ध संपवण्यास सांगावे, अन्यथा आम्ही इस्रायलला या पृथ्वीवरून नष्ट करू."
पाकिस्तान ने एटम बम दिखाने के लिए नहीं रखे हैं।
इजरायल अगर मुसलमानों पर जुल्म बंद नहीं करेगा तो हम इजरायल को दुनिया के नक्शे से मिटा देंगे।
सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेयर करुन लोकं पाकिस्तानच्या कट्टरपंथी विचारधारेवर टीका करत आहेत. तर काही लोकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली. या महिला खासदारच नाहीतर पाकिस्तानमधील अनेक कट्टरपंथी विचारधारेचे राजकारणी इस्रायला नष्ट करण्याची धमकी देतात.
काही दिवसांपूर्वीच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध शतकीय खेळी करुन आपल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद रिजवानने आपले शतक हमासच्या आतंकवाद्यांना समर्पित केले होते. त्याच्या या कृत्यामुळे सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला.