स्वप्नील जोशीचे चाहत्यांसाठी सरप्राईज, म्हणाला “जगातील सर्व स्त्रियांना…”

    16-Oct-2023
Total Views |

swapnil 
 
मुंबई : 'वाळवी' चित्रपटानंतर अभिनेता स्वप्निल जोशी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजसृष्टीतला चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या स्वप्निलचा नाच गं धुमा हा चित्रपट येणार असल्याची माहिती त्याने त्याच्या सोश मिडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
 
काय आहे स्वप्नीलची पोस्ट?
 
“काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या ! घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा.. ‘नाच गं घुमा’. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.
 
या सोबत त्याने या चित्रपटाचा एक टीझर व्हिडीओही शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी करणार आहेत. त्यामुळे ‘वाळवी’ नंतर पुन्हा एकदा परेश मोकाशी आणि स्वप्नील एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर...; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

"जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर..."; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121