...तेव्हा नाना पाटेकर आगीत होरपळले, दाढी-मिशा, पापण्या, त्वचा सगळं काही जळालं

    23-Aug-2025
Total Views |


मुंबई : अभिनेते नाना पाटेकर हे एक अष्टपैलू अभिनेते आहेतच. पण त्यांनी आजवर केलेले सिनेमे हे नेहमीच काहीतरी वेगळा संदेश घेऊन येणारे ठरले आहेत. काही सिनेमांमध्ये नाना पाटेकरांना साकारलेल्या भूमिका अगदी अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. त्यासाठी स्वतः नानांनी प्रचंड मेहनतही घेतली होती. नानांनी अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आजवर काम केलं आहे. आणि यासोबतच ते सामाजिख क्षेत्रात देखील कार्यरत असल्याचं पाहायला मिळते.

पण आज मागे वळून पाहताना या सिनेमांमधल्या काही सीन्ससाठी मात्र नानांना मोठी कसरत करायला लागायची याची आठवण नानांना होते. परफेक्ट शॉर्ट देण्यासाठी नाना पाटेकरांना अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. असाच एक किस्सा नानांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नाना पाटेकरांनी त्यांनी शूट केलेल्या एका सीनबाबत सांगितलं. सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये क्लायमॅक्स सीनमध्ये नाना पाटेकर जे पात्र साकारत होते, ते आगीत होरपळताना दाखवावं लागणार होतं. पण, त्या काळी जास्त टेक्नोलॉजी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे सीन्समध्ये क्रोमाकट आणि व्हिएकएक्सने आग दाखवणे शकत नव्हते. त्यावेळी सेटवर खरीखुरी आग लावली जायची. पण हा सीन शूट करताना थोडं इकडे-तिकडे झालं आणि नाना पाटेकर त्या आगीत खरेखुरे होरपळून निघालेले. नानां खूप त्रास झालेला, आणि यानंतर कित्येक महिने ते अंथरुणाला खिळले होते. या आठवणी सांगताना आजही नानांच्या अंगावर काटा येतो.

याविषयी बोलताना नाना पाटेकर यांनी सांगितलं की, "परिंदामधील ज्या सीनमध्ये मी आगीत होरपळून निघतो.. त्यात माझ्या संपूर्ण शरीराला खरोखरंच आग लागलेली. मला दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं... माझी चामडीही जळालेली... सर्व काही जळालं... दाढी, मिशा, पापण्या, सर्व काही जळालं... मी सहा महिने असाच होतो... पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या, दुसऱ्या टेकमध्ये आम्ही 14 बादल्या ओतल्या... आग खूप मोठी होती... तो एक अपघात होता..."

पुढे बोलताना नाना पाटेकरांनी 'सलाम बॉम्बे' सिनेमातील एका दृश्याबाबतही सांगितलं. ज्यामध्ये त्यांना खरोखरंच चाकूनं मारण्यात आलेलं. त्यावेळी सेटवर सर्वांना वाटलेलं की, हा शुटिंग सीन सुरू आहे. पण, त्यावेळी नाना पाटेकरांनावर खरेखुरे वार करण्यात आलेले.

नाना पाटेकर म्हणाले की, "तुम्हाला तो सीन आठवतो का? जिथे एक मुलगा येतो आणि मला चाकू मारतो? त्या सीनसाठी त्यांनी माझ्या कंबरेला टायर बांधला होता, पण ज्या जोरानं त्या मुलानं माझ्यावर हल्ला केला, त्याच जोरात चाकूनं मला मारलं आणि लगेच रक्त यायला लागलं. त्यांना वाटलं, त्यानं काय अभिनय केलाय, पण तो अपघात होता..." 
असे अनेक किस्से नानांनी यावेळी सांगितले होते.