‘घटस्फोटाचा पश्चाताप नाही’, सैफ अलीची पहिली पत्नी काय म्हणाली? वाचा
20-Aug-2025
Total Views |
मुंबई : अभिनेत्री करीना कपूरशी विवाह करण्यापूर्वी अभिनेता सैफ अली खानचं अभिनेत्री अमृता सिंगबरोबर लग्न झालं होतं. एकेकाळी दोघंही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेले होते. इतके की त्यांना वयाचं अंतरही रोखू शकले नाही. १९९१ साली अमृता आणि सैफचं लग्न झाल होतं. दोघांच्याही वयात चक्क १२ वर्षांचं अंतर होते. अमृता ही सैफ पेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. असं सांगितलं जातं की पतौडी कुटुंबाला अर्थातच खान कुटुंबियांना हे लग्न मुळीच मान्य नव्हतं पण अखेर दोघांनी विवाह केलाच. त्यावेळी अमृता सिंग ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता, सुरुवातीला ते दोघेही आनंदात होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
२००४ साली सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला होता. दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान, अशी दोन मुलं आहेत. तर त्यांची मुलं देखील आता बॉलीवूडमध्ये चांगल नाव मिळवताना दिसत आहेत. मात्र या घटस्फोटानंतर सैफने दुसरं लग्न केलं पण अमृताने सिंगल मदर बनून मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमृता एकटी पडली होती.
अमृता सिंगने एका मुलाखततीत त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले होते. याविषयी बोलताना ती म्हणाली होती, “घटस्फोटानंतर मला कामाची गरज होती. मला मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज होती. मला दोन मुले होती. मला निराश होऊन घरी बसायचे नव्हते. मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला; अन्यथा मी खूप आळशी आहे. माझ्याकडे जे काही होते, त्यात मी समाधानी होते. सर्वप्रथम मला या टप्प्यातून बाहेर पडावं लागलं. अभिनय सोडल्याबद्दल मला अजिबात पश्चात्ताप नाही. लग्न ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खूप खास गोष्ट आहे. लग्न करण्याचा अनुभव माझ्यासाठी अदभुत होता. मला दोन सुंदर मुलं आहेत. माझे लग्न यशस्वी झाले नाही. मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. माझ्या १२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मला खूप काही मिळाले.”
अमृता सिंग पुढे म्हणाली, “घटस्फोटानंतर सर्वप्रथम मला माझ्या मानसिक स्थितीशी संघर्ष करावा लागला. नंतर मला माझ्या शारिरीक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे लागले. माझ्या मुलांनी मला परिस्थितीसमोर पराभूत झालेले पाहू नये, असे मला वाटत होते. घटस्फोटामुळे मी खूप दुःखी होते. आता मी काही प्रकारे माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि काही प्रकारे दुःखी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे घडते. . फक्त एकच दुःख आहे की, मी मुलांना वेळ देऊ शकले नाही.” तर पुढे पुनर्विवाहाच्या प्रश्नावर अमृता म्हणाली होती, “आता मी १६ वर्षांची नाही. खरं सांगायचं तर, मी त्याबद्दल विचार करीत नाही. माझ्याकडे पती देऊ शकेल, असे सर्व काही आहे. काही गोष्टी वगळता म्हणून मला लग्नाची गरज नाही.”
सैफ आणि अमृताची मुलं लहानपणापासूनच आई अमृताकडे राहतात. मुलगी सारा अली खान नेहमीच आपल्याला आईचा सगळ्याच गोष्टीत पाठींबा मिळाल्याचंही सांगत असते. दरम्यान सैफने अमृताला घटस्फोटावेळी ५ कोटी रुपये आणि १ बंगला दिल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.