अभिनेत्री सायली संजीवच्या प्रमुख उपस्थितीत किर्ती महविद्यालयात फिल्म कल्बचे उद्घाटन - विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

    23-Aug-2025
Total Views |

मुंबई : किर्ती महाविद्यालय आणि विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ ऑगस्ट रोजी किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात किर्ती फिल्म क्लब’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव उपस्थित होत्या. किर्ती फिल्म कल्ब सुरू करण्यामागची संक्लपना या कार्यक्रमात सुरुवातीला सांगण्यात आली.

सिनेमा हा फक्त मनोरंजनासाठी नाही तर शिक्षणाच्या दृष्टीने पाहण्याची संधी किर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थयांना लाभली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी महाविद्याल्याच्या उपप्राचार्या डॉ. अपुर्वा यादव, बी.ए.एम.एम.सीच्या विभागाचे शिक्षक अमित चव्हाण, डॉ. निशिथ भांडारकर, कार्यकर्ते हर्ष मोदी, चित्रपट निर्माते जीतेंद्र देखिल उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात ही बी.ए.एम.एम.सीच्या विभाग प्रमुख डॉ. मीनल अमबावणे यांनी केली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तुळशीचे रोपटं देऊन करण्यात आला.

आजच्या काळात सोशल मिडियामुळे एका जागी बसुन चित्रपट पाहण्यासाठी लोक कंटाळतात यासाठी मुलांना ३ तासांचा चित्रपट किंवा २५ मिनिटांचा माहितीपट दाखवण्याचा उपक्रम किर्ती महाविद्यालयाने हाती घेतल्याची माहिती आहे.

किर्ती फिल्म क्लब सुरू करण्यामागचे कारण म्हणजे चित्रपट हा फक्त मनोरंजनाचा भाग नसुन तो दैनंदिन जीवनाशी निगडित असतो, फिल्म क्लब प्रत्येक महिन्यात भरेल, या कल्बमध्ये चित्रपट किंवा माहितीपट दाखवण्यात येईल. त्यानंतर त्या विषयी चर्चा होईल, विश्लेषण होईल. हा उपक्रम फक्त चित्रपटा विषयी जनजागृती करणार नाही तर लोकांमधली दडलेल्या दिगदर्शकाला आपला दृष्टीकोण दाखवून देण्याची संधी देणार आहे. असे डॉ. मिनल अमबावणे यांनी सांगितले.

’’संवाद केल्या शिवाय आपण लोकांना समजुन घेऊ शकत नाही. शिक्षणासोबत मनोरंजन करण्याची संधी आपल्याला किर्ती फिल्म कल्ब देत आहे.’’ असे डॉ. निशिथ भांडारकर यांनी केले.

- मानसी गुरव