शेअर मार्केट अपडेट्स: युद्धाचे मार्केटवर सावट
क्लोजिंग बेलनंतर एनएससी १९ गुणांनी घसरत १९७३१.७५ वर बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ११६ गुणांनी घटत ६६१६६.९३ वर
मुंबई: जीओपोलिटीकल तणाव असतानाचा प्रभाव आज शेअर बाजारात पण जाणवला आहे. इस्त्रायल हमास युद्धाच्या काळात होत असलेली हानी पाहता यांचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. इंधन, एनर्जी, व्यापारी आयात निर्यात यामध्ये परिणाम होऊन डॉलर रूपया सेंटलमेंट मध्ये देखील त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.आज क्लोजिंग बेलनंतर एनएससी १९ गुणांनी घसरत १९७३१.७५ वर आला आहे.बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ११६ गुणांनी घटत ६६१६६.९३ वर येऊन ठेपला आहे.
इक्विटी गुंतवणूकीत नकारात्मकता आल्यामुळे मिड आणि स्मॉल कॅप कंपनी इंडेक्सवर याचा प्रभाव दिसून आला. NSE वर KIOCL , Vakrangee, MMTC, Gujarat State Fertilizer, ITI, Delta Corp हे शेअर टॉप गेनर ठरले आहेत तर टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, एशियन पेंटस, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप लूजर ठरले आहेत. बँक निफ्टी ६२.५ गुणांनी घटला. फार्मा, मिडिया, एफएमसीजी, रिअल्टी, हेल्थकेअर सेक्टर मध्ये आज नुकसान पहायला मिळाले.
दुसरीकडे मेटल, पीएसयु सेक्टर,ऑटो सेक्टर मध्ये अंशतः तेजी पहायला मिळाली.बीएसी मध्ये एशियन पेंटस, एक्सिस बँक, बजाज फायनान्स,बजाज फिनसर्व,भारती एअरटेल हे शेअर्स टॉप लूजर ठरले असून इन्फोसिस जेएसडब्लू,जिओ फायनान्शिअल सर्विसेस, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टयूब्रो हे शेअर्स तेजीत पहायला मिळाले.