दरवर्षी साजरा होणार चांद्रयान-३ च्या यशाचा आनंद! २३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित
14-Oct-2023
Total Views | 39
मुंबई : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास घडवला आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या सगळ्या यशानंतर आता हा आनंद साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
त्यानुसार दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्याने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारने शनिवारी यासंबंधीची अधिसुचना जारी केली आहे.
Government of India declares August 23 of every year as 'National Space Day' to commemorate the success of the Chandrayaan-3 Mission on 23rd August 2023 with the landing of the Vikram lander and deployment of the Pragyaan Rover on the lunar surface. pic.twitter.com/5BSXJH5LCO
२३ ऑगस्ट हा दिवस देशाच्या अंतराळ मोहिमेतील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे अंतराळ क्षेत्राला चालना मिळेल आणि तरुणांना या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. हे लक्षात घेऊन सरकारने दरवर्षी २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या अधिसुचनेमध्ये म्हटले आहे.