भारतात चित्त्यांनी घेतला पहिल्या जेवणाचा आस्वाद

चित्त्यांकडून कुतूहलाने नवीन परिसराचे निरीक्षण

    23-Sep-2022
Total Views | 33
Leopard
 
मुंबई : नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी दोन भावंडं 'फ्रेडी' आणि 'अल्टोन' मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये खेळताना दिसल्याचे, उद्यान प्रशासनाने सांगितले आहे. रविवार दि. १८ रोजी संध्याकाळी एका दिवसानंतर त्या सर्वांना भारतात आल्यापासून पहिल्यांदाच जेवण दिले गेले.
 
 
रविवारी सायंकाळी प्रत्येकी आठ चित्त्यांना दोन किलो म्हशीचे मांस देण्यात आले. त्यापैकी फक्त एकाने कमी खाल्ले, अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी दि. १९ सप्टेंबर रोजी चित्ते आनंदी आणि सक्रिय दिसत होते. हे प्राणी तीन दिवसांतून एकदा अन्न खातात. नामिबियामध्ये आठ चित्त्यांना त्यांची नावे देण्यात आली. "सध्या त्यांची नावे बदलण्याची आमची योजना नाही," असे अधिकारी म्हणाले. भारत आणि नामिबियातील पशुवैद्य आणि तज्ज्ञ चित्तांवर बारीक नजर ठेवून आहेत. या चित्त्यांना एका महिन्यासाठी विलागीकरणात ठेवले जाईल.
अग्रलेख
जरुर वाचा
हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

इस्लामिक देश कझाकस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालत हिजामुक्त कझाकस्तान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे येथील स्त्रीयांसाठी हा मोठा निर्णय असून त्यांना आता समाजात वावरताना मोकळा श्वास घेता येणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कझाकस्तानचे पंतप्रधान कासिम जोमार्ट टोकायेव यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केलीय. खरंतर चेहरा झाकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्यात कोणत्याही एका धर्म किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, पण इतकं मात्र स्पष्ट आहे की सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर ..

पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

(PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्क..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121