...आणि पुन्हा आदित्य ठाकरे छत्री असूनही पावसात भिजले!
17-Aug-2022
Total Views | 126
94
मुंबई : पावसात भिजले की सत्ता लोक भावनिक होतात आणि मग सत्ता आणता येते असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समज करून दिल्याने आदित्य ठाकरे त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा वापर करतात. रायगड येथे सुरु असलेल्या शिवसंवाद यात्रेच्या वेळी बरोबर छत्री असूनही आदित्य ठाकरेंनी मुद्दाम पावसात भिजत दौरा केला. त्यामुळे सत्ता गेली की लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे शरद पवारांच्याच मार्गाने जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता परत कधी सत्ता मिळेपर्यंत आदित्य ठाकरे पावसात भिजतच दौरे करणार का ? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो.
"ही स्वराज्य भूमी आहे इथे गद्दारांना धडा शिकवलं जातो"
महाराष्ट्र ही स्वराज्याची भूमी आहे त्यामुळे इथे गद्दारांना थारा नाही, त्यांना मतदार धडा शिकवतीलच हे आपले नेहमीचेच भाषण आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केले. जे गेले ते गद्दार होते, त्यांनी विश्वासघात केला, जे खरे शिवसैनिक आहेत त्यांच्या रक्तात शिवसेना असते ते कधीच असे करणार नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केला. त्या ४० गद्दारांमध्ये हिंमत नव्हती, जर असती तर त्यांनी महाराष्ट्रात राहून उठाव केला असता, त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणूनच ते पळून गेले. म्हणून ते गद्दार आहेत आरसा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.
मंत्रिमंडळ विस्तारात निष्ठावंतांना स्थान मिळालेच नाहीये, ज्यांना मंत्रीपदे मिळाली त्यांची महाविकास आघाडीमध्ये चांगली अवस्था होती.मंत्रिमंडळ विस्तारानंतर खरे सत्ताधारी कोण आणि खरे मुख्यमंत्री कोण हे सगळ्या महाराष्ट्राला आता कळले आहे. "त्या लाचारांना मी अजूनही सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांच्यासाठी अजूनही दरवाजे उघडेच आहेत. त्यामुळे ज्यांना परत यायचे असेल त्यांनी परत यावे अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.