मुंबई : "शिवसेना हा कौटुंबिक पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे हेच आमचे कुटुंबप्रमुख आहेत" असे वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. शिवसेना भवनातील माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी आम्हांला कानमंत्र दिला आहे की तुम्हांला कितीही आमिषे दाखवली गेली तरी तुम्ही आपले काम सोडू नका आणि कोणाचे ऐकू नका. त्यामुळे आता शिवसैनिक याच आदेशानुसार काम करतील असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईकर नागरिक अजूनही आमच्याशीच त्यांची सुख दुःख शेअर करतात, अजूनही आम्हीच त्यांच्यासाठी जवळचे आहोत. त्यामुळे आम्ही आता त्यांच्यासाठी काम करणार. शिवसेनेतून जे गेले ते गेले त्या लोकांबद्दल शिवसेनाप्रमुख बोलतील मी का बोलू ? अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटावर दिली. सध्या मुंबईत सुरु असणाऱ्या पावसाने मुंबईत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काम करणार अशीच प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली.