सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी’ योजनेतून मिळणार विनाशुल्क परवाने

गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज

    27-Jul-2022
Total Views | 89

thane
 
 
ठाणे: ठाण्यात गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यासोबतच मंडळांना संबंधित प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रात ‘एक खिडकी’ योजनेद्वारेदेखील अर्ज सादर करता येणार आहेत. या दोन्ही पद्धतीने सादर केलेल्या अर्जांची छाननी केल्यावर संबंधित प्रभाग समितीकडून विनाशुल्क परवानगी प्रदान करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
 
 
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस, महावितरण, गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, गणेश मूर्तिकार यांच्या समवेत मनपा मुख्यालयात नुकतीच समन्वय बैठक झाली. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधांसोबतच ‘एक खिडकी’ योजनेद्वारेदेखीलअर्ज सादर करता येतील. यामध्ये वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासन यांच्या प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी देण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगी शुल्क व अनामत रक्कम न घेण्याबाबतही निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधाmc.infosoftech.co.in/ mandaponline.html या लिंकवर उपलब्ध आहे.
 
 
तसेच, ऑनलाईन सुविधेमध्ये मंडप परवानगीसाठी पोलीस विभाग, वाहतूक पोलीस विभाग, अग्निशमन विभाग यांचा ना हरकत दाखला ऑनलाईन पद्धतीने api.infosoftech.co.in//login या लिंकवर ऑटो जनरेट पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. अन्यथा परवानगी नाही असे गृहीत धरुन कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीत ठाण्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी गणेश आगमन ते विसर्जन सुविधा, त्यांची व्यवस्था व येणार्‍या अडचणी मांडल्या. गणेशोत्सव काळात महापालिकेच्या परवानग्या, व्यवस्था आदींबाबत काहीही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी उपआयुक्त जी. जी. गोदेपुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, परवानगीबाबत काही अडचणी असल्यास ८६५७८८७१०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
‘कोरोना’ काळानंतर प्रथमच गणेशोत्सव निर्बंधमुक्त
 
कोरोना काळानंतर प्रथमच गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीच्या उंचीचे निर्बंध शासनाकडून हटविण्यात आलेले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीचे आगमन आणि गणेशमूर्तीचे विसर्जन मार्गावरील ‘ओव्हरहेड वायर’ची पाहणी करून कमी उंचीवर असलेले ‘ओव्हरहेड वायर’ची उंची वाढविण्याचे काम तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार वीजपुरवठा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सदर बैठकीत दिल्या.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'महाकुंभाभिषेक' हा धार्मिक विधी आयोजित केला जातोय. जवळजवळ २७० वर्षांनंतर हा धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाला. या विधीसोबतच मंदिरात विश्वक्षेनाची मूर्ती देखील पुनर्प्रस्थापित करण्यात आली. त्यासोबतच तिरुवांबडी श्री कृष्णस्वामी मंदिरात 'अष्टबंधकलशम' नावाचा एक महत्त्वाचा पूजाविधीही केला जाणार असल्याची माहिती आहे. महाकुंभभिषेक हा एक विशेष धार्मिक विधी आहे जो तीर्थस्थळ किंवा मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी केला जातो. ही प्रक्रिया आगम शास्त्रांवर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121