बुलंदशहरच्या मशिदीत शुक्रवारच्या नमाजावेळी गोळीबार

    15-Jul-2022
Total Views | 54
इद्रीस
 
 
 
 
लखनौ: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये, शुक्रवारी दि. १५ जुलै रोजी सकाळी सशस्त्र हल्लेखोरांनी एका मशिदीत घुसून नमाज अदा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या एका वृद्धाची निर्घृण हत्या केली. या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. बुरखा घातलेले मारेकरी मशिदीत घुसले आणि मशिदीच्या आवारातच गोळीबार करून मृत वृद्धाची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, इद्रिस (वय ६५, अब्दुल गफ्फूरचा मुलगा) हा बुलंदशहरच्या खुर्जानगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेख पेन मोहल्लामध्ये राहत होता. याच मोहल्ल्यात राहणाऱ्या काही लोकांशी इद्रिसचा जुना वाद होता. इद्रिसने त्या लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. शुक्रवार, 15 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास इद्रिस हा मशिदीत नमाज पढण्यासाठी गेला होता. त्यावेळी मशिदीत आणखी पाच-सहा लोक आले होते. संधी साधून एकाने इद्रिसवर गोळ्या झाडल्या, त्यात त्याचा मृत्यू झाला.
 
 
एक गोळी इद्रिसच्या छातीत तर एक गोळी उजव्या हातात लागली. काही काळ मशिदीत पडून राहिल्याने इद्रिसला खूप रक्तस्त्राव झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून मशिदीत उपस्थित असलेले सर्व लोक पळून गेले. उल्लेखनीय आहे की, इद्रिसचा बुलंदशहरमध्ये लोखंड आणि स्टीलच्या कामाचा व्यवसाय होता. जुन्या वैमनस्यातून वडिलांची हत्या झाल्याचा आरोप इद्रिसचा मुलगा आस मोहम्मदने केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
हत्येची माहिती मिळताच बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह आणि एसएसपी श्लोक कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. एसएसपी श्लोक कुमार म्हणाले, “इद्रिस नावाचा एक व्यक्ती मशिदीत नमाज पढण्यासाठी गेला होता आणि तिथे त्याची हत्या करण्यात आली. बुलंदशहरमधील त्याच परिसरात राहणाऱ्या सरफराज नावाच्या व्यक्तीवर कुटुंबीयांनी आरोप केला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समजले. पण आम्ही या घटनेतील इतर बाजूही तपासत आहोत. पुढील तपासासाठी आम्ही मशिदीजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.”
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121