भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तेलंगाणामध्ये

    01-Jun-2022
Total Views | 55
 

bjp  
 
 
 
 
 
नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुढील महिन्यात २ व ३ जुलै रोजी तेलंगाणामधील हैदराबाद येथे होणार असल्याचे समजते. बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
 
राष्ट्रीय कार्यकारिणी ही भाजपची प्रमुख समिती असून पक्षाचे धोरण आणि रणनिती ठरविण्याचे काम ही कार्यकारिणी करत असते. वर्षअखेरीस होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस विशेष महत्व प्राप्त होणार आहे. गुजरातमध्ये गेल्या २९ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापन करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यास भाजप उत्सुक आहे. त्याचप्रमाणे पहाडी राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्येही सत्ता कायम राखण्यासाठी भाजप तयारी करत आहे. त्यामुळे बैठकीमध्ये या दोन राज्यांच्या निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
  
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगाणामध्ये आयोजित करून भाजपने आपल्या दक्षिण दिग्विजयाचे मनसुबे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यापूर्वी झालेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच भाजपने मोठे यश मिळविले होते. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगाणा विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्रसमितीस मोठे आव्हान देण्यास भाजप सज्ज आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाना त्यांच्याच गृहराज्यात आव्हान देण्याचाही भाजपचा प्रयत्न असणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121