एसटीतील नोकरभरती बंद, २२०० उमेदवारांना फटका

नफ्यात येई पर्यंत नवी भरती नाही

    06-Mar-2022
Total Views | 88
                
ST
    
 
 
मुंबई: एसटी संपामुळे एसटीला प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आधीच महामंडळ नुकसानीत होते त्यात संपामुळे अजून मोठा फटका बसला आहे. या सर्व गोष्टींमुळे एसटीचा एकूण तोटा १० हजार कोटींहून अधिक झाला आहे. यामुळे महामंडळाकडून नवीन भरती प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आहे. महामंडळ पुन्हा नफ्यात येई पर्यंत भरती थांबवली जाणार असल्याने, प्रतीक्षा यादीवरील २२०० उमेदवारांना फटका बसला आहे. त्यांचे भरतीचे दरवाज बंद झाले आहेत. हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालातसुद्धा नोकरभरतीवर बंदी घालण्याचे सुचवले आहे.
 
 
 
२०२१-२२ या वर्षात ६ हजार ८९० कोटी उत्पन्न मिळाले असून खर्च १० हजार १९८ कोटी रुपये झाला आहे. यामुळे आधीच होत असलेल्या तोट्यात प्रचंड वाढ झाली आहे.त्यातच चार महिन्यांहून जास्त काळ चाललेल्या या संपाने अजूनच नुकसान केले आहे. "सततचे घटते उत्पन्न, वाढत तोटा यांमुळे आधीच महामंडळाला सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत होते, त्यात आता अजूनच परिस्थिती वाईट झाली आहे.जो पर्यंत हा तोटा कमी होत नाही तो पर्यंत कुठलाही नवीन भर माळमांडळाला पेलवणार नाही. त्यामुळे नव्या नोकर भरतीवर स्थगिती आणण्यात आली आहे." अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121