'स्वरयुगान्त' : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

    06-Feb-2022
Total Views | 156

Lata


 
मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात रविवार सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेले दोन महिने त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. आपल्या जादुई स्वरांनी संपुर्ण जगाला भुरळ घालणारा आवाज हरपला अशीच भावना प्रत्येक क्षेत्रातून व्यक्त होते आहे. भारतीय कलाक्षेत्रातले एक युग आज संपले.

 
लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले होते. पण त्यांची प्रकृती सुधारू लागली होती. ५ फेब्रुवारीला अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते पण त्यांची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 
 
मंगेशकर घराणे हे मूळचे गोव्याच्या मंगेशीचे. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक नट होते. त्यांचे वडीलच हे त्यांचे पहिले गुरु. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. सुरुवातीला नाटक चित्रपटांमध्ये अभिनय केल्यावर पुढे त्यांनी गाण्यावरच लक्ष केंद्रित केले आणि इतिहास घडवला. अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून त्यांनी गायलेली गाणी अजरामर ठरली. अतिशय सुरेल,गोड चढा असलेला स्वर हीच त्यांच्या आवाजाची ओळख होती. भारतीय संगीत क्षेत्रातील लता मंगेशकर यांचं अढळ स्थान आहे. २००१ साली त्यांना भारत सरकार कडून 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले होते.



 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121