मुंबई: एक कोरियन युट्युबर महिला भारत भ्रमंतीसाठी आली होती त्या दरम्यान खार परिसरातील मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीनं नावाच्या दोन गर्दुल्ल्यांनी कोरियन युट्युबरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या दोघांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला व जबरदस्तीही करत तिला बळजबरीने ओढत आपल्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. हा सर्व प्रकार तरुणींने युट्युब चॅनलवर लाईव्ह व्हीडिओ सुरू केला होता.
त्यामूळे हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सर्वत्र देशाच नाव खराब करणाऱ्यां विरोधात संताप व्यक्त होत असून करवाईची मागणी केली जात होती. त्यामूळेच खार पोलीसांनी या आरोपींना अटक केली होती. आज या दोन्ही आरोपींना वांद्रे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलेलं होतं. दंडाधिकारी कोर्टाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.
अतिथी देवो भवंः मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रयत्न या दोन नराधमांनी केला होता तरी देखिल केवळ १५ हजार दंड घेऊन ह्यांची सुटका केल्या बदल नेटकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.