बीएनसीए वारसा संवर्धन तज्ञाच्या भूमिकेत!

केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून नेमणूक

    11-Dec-2022
Total Views | 52

बीएनसीए
 
 


पुणे:
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील साडेतीन हजार ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या ठिकाणांजवळील वस्ती आणि बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठी व त्यासाठी लागणारे पूरक नियम तयार करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक प्राधिकरणातर्फे (नॅशनल मॉन्यूमेंट्स अ‍ॅथोरिटी ) देशभरातील 47 शिक्षणसंस्थांमधील वारसातज्ज्ञांची नेमणूक केली गेली आहे . त्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक विभागातर्फे सरकारी आध्यादेश आणि पत्रकही नुकतेच काढण्यात आले . त्यामध्ये पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन ( बीएनसीए ) चा समावेश आहे.
 
पुण्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मान्यता दिलेल्या पहिल्या दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये शनिवारवाडा , आगाखान पॅलेस आणि पाताळेश्वर लेणीचा समावेश आहे . या तिन्ही वास्तूंजवळ मानवी वस्ती असून रहदारीसाठी रस्ते व पूरक बांधकामे केली जात आहेत . नवीन कायद्यानुसार आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या बांधकामांच्या पासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणतेही इतर बांधकाम करणे तसेच २०० मीटरपर्यंत त्यासंबंधी विविध अटी - शर्तीसह त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.वारसातज्ज्ञ म्हणून बीएनसीएच्या सांस्कृतिक अध्ययन केंद्राच्या प्रमुख डॉ. वैशाली लाटकर आणि अकादमीक समन्वयक डॉ. शार्वेय धोंगडे काम करणार आहेत.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121