भारताचं स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर! प्रतिमिनिट 750 गोळ्या झाडण्याची क्षमता!

    03-Oct-2022
Total Views | 77

Maha MTB



 
 
 
मुंबई: भारतीय हवाई दलात नवीन पहिलं स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सैन्य दलात दाखल होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय हवाई दलात स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH-HAL Light Combat Helicopter) आज सामील होणार आहेत. जोधपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही स्वदेशी LCH जोधपूर सीमेजवळ तैनात करण्यात येतील. 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत भारत स्वदेशीवर भर देत आहे. त्या दृष्टीने ह महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय संरक्षण दलात आज 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) दाखल होणार आहेत. यातील पाच हेलिकॉप्टर सैन्य दलात आणि पाच हवाई दलात सेवेत असतील.
 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत लिहिलं की, 'स्वदेशी बनावटीचं पहिलं लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हवाई दलात सामील होणार आहे. यासाठी मी 3 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे उपस्थित असेन. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.' भारताने नुकतेच अमेरिकेकडून अपाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी केले असेल, परंतु अपाचेला कारगिल आणि सियाचीनच्या टेकड्यांवर टेक ऑफ आणि लँडिंगमध्येही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याचं कारण अपाची वजनाने जड आहे. मात्र, त्याच्या तुलनेने LCH हेलिकॉप्टर अत्यंत हलके असल्यामुळे LCH उंच भागात शत्रूंवर हल्ला करु शकते.
 
 
 
Light Combat Helicopter
 
 
 
 
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL - Hindustan Aeronautics Limited) कंपनीकडून LCH हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मते, LCH हेलिकॉप्टरमध्ये असलेले फिचर्स शत्रूच्या रडारमध्ये सहज पकडले जाणार नाहीत. जर शत्रूच्या हेलिकॉप्टर किंवा फायटर जेटने त्याचं क्षेपणास्त्र एलसीएचवर डागलं तर LCH क्षेपणास्त्राचा मारा चुकवू शकते. LCH हेलिकॉप्टरवर शत्रूच्या गोळीबाराचा कोणताही परिणाम होणार नाही.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121