स्वत:ची क्षमता ओळखून ध्येय निश्चित करा

आयुक्त शेखर सिंह यांचे मत ‘लक्षवेध- क्रॅकिंग द कोड’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    21-Oct-2022
Total Views | 35

shekhar si\
 
 
पुणे : “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असून खडतर मेहनत करून विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
 
 
पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’ आणि ‘डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ’यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022’ अंतर्गत पिंपरी येथील ‘डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘लक्षवेध- क्रॅकिंग द कोड’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आयुक्त बोलत होते. साहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, ‘डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ पिंपरीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, ‘फॉक्सबेरी’चे ‘सीईओ’ अंकित भार्गव, ‘फार्मदीदी’ संस्थेचे सहसंस्थापक अनुक्रीत जोहारी या मान्यवरांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
 
 
‘स्मार्ट सिटी’चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, प्राचार्य डॉ. एल.के. वाधवा, कार्यकारी संचालक प्रा. अविनाश ठाकूर, डीन प्रा. धीरज अग्रवाल, उपायुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्मार्ट सिटी व ‘स्मार्ट सारथी टीम’चे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
आयुक्त शेखर सिंह पुढे म्हणाले की, “कोणत्याही स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. स्पर्धा परीक्षा देताना वेळेची मर्यादा बांधून घेणे आवश्यक आहे. लोकसेवेत कार्यरत असताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत असून त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करावा. स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करायला हवे.‘’ साहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले म्हणाले की, “महाविद्यालय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते. एखादे ध्येय मनापासून ठरवून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले, तर यशाचे शिखर नक्की गाठता येते.“ प्रास्ताविक डॉ. सोमनाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन पायल भार्गव यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ‘स्मार्ट सिटी’ व ‘स्मार्ट सारथी टीम’द्वारे करण्यात आले.
अग्रलेख
जरुर वाचा
अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121