नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कठोर निर्बंध लावण्यात येतील असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र नागरिक अद्यापही निर्धास्त होऊन फिरत आहेत. यावर आवर घालणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे', असे त्यानी पत्रकारपरिषदेत सांगितले. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असल्याने निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.