"...तर महापौर आणि पालकमंत्र्यांनी मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे"

महापौर आणि पालकमंत्र्यांना भाजप आमदार अमित साटम यांचा इशारा

    27-Jan-2022
Total Views |

Aslam Sheikh
मुंबई : मालाडमधील मालवणीतील एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्यात आले. यामध्ये कॉंग्रेसचे नेते आणि पालकमंत्री असलम शेख यांचा पुढाकार असून भाजपने यावरून विरोध दर्शवला आहे. यावरून पालकमंत्री असलम शेख आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोप केले की, भाजप नगरसेवकानीच २०११मध्ये एका रस्त्याच्या नामांतरणासाठी टिपू सुलतानच्या नावाचे अनुमोदन केले असल्यचे म्हंटले. यानंतर आता भाजप आमदार अमित साटम यांनी 'पुरावे असतील तर सदर करा, नाहीतर मानहानीच्या याचिकेसाठी तयार रहा.' असा इशाराच दिला.
 
 
 
 
भाजप आमदार अमित साटम यांनी म्हंटले आहे की, "लॉकडाऊनमध्ये कॉर्डिलिया क्रूजला परवानगी देणारे, याकूब मेननला फाशी देण्यास येऊ नये यासाठी प्रयत्नशील असणारे पालकमंत्री अस्लम शेख हे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह माझ्यावर खोटे आरोप करत आहेत की मी कुठल्यातरी रस्त्याच्या नामकरणासाठी टिपू सुलतानच्या नावाचे अनुमोदन केले आहे."
 
 
 
 
पुढे त्यांनी म्हटले की, "स्वतःच्या तुंबड्या झाकायला पालकमंत्री असलम शेख आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे केलेले आरोप खोटे असून त्यांनी याविषयी मी केलेला कोणताही प्रस्ताव किंवा पत्र असेल तर आताच दाखवावे! नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जाण्यास तयार रहावे." असा इशारा दिला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121