आ.सरनाईकांच्या कार्यक्रमात शिवसेना गायब ?
दहीहंडीऐवजी होणाऱ्या आरोग्य उत्सवाच्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेचा नामोल्लेख नाही
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची ठाण्यातील बहुचर्चित दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली असुन दहीहंडी उत्सवाच्या खर्चातुन मोफत आरोग्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती आ.सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मात्र या आरोग्य उत्सवाच्या नियोजनापासुन ते ३१ ऑगस्ट रोजीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसिद्धी पत्रकातुन 'शिवसेनेचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकिय धुरीणांच्या भुवया उंचावल्या आहेत.मात्र, शिवसेना सोडुन भाजपमध्ये प्रवेश करणार का ? या प्रश्नावर या केवळ माध्यमांमधील चर्चा असल्याचे स्पष्ट करून सेना नेतृत्व माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येत असल्याचे स्पष्ट केले.
कोरोनाचे संकट असल्याने गर्दी करून दहीहंडी साजरी न करता त्याऐवजी जनतेला आरोग्य सुविधा देण्याचे आ. सरनाईक यांनी ठरवले आहे.त्यानुसार,मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला दिली प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन उत्सवाचे मोठे आयोजन न करता 'आरोग्य उत्सव' अंतर्गत ऑक्सिजन प्लांट मार्फत मोफत ऑक्सिजन,रुग्णवाहिका,मोक्षरथ, कर्करोग निदान वाहन आणि रक्तदान वाहन आदींच्या माध्यमातुन ओवळा-माजिवडा येथील नागरीकांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस सरनाईक यानी व्यक्त केला.
मात्र,इतक्या मोठ्या आरोग्य उत्सवाच्या जाहिरबाजीत सरनाईक यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान,पत्रकार परिषदेत बोलताना,भाजप प्रवेशाच्या बातम्यांना अर्थ नसुन असे प्रत्येकाबद्दल बोलत बसलात तर शिवसेनेत एकही आमदार उरणार नाही.असे सांगुन आपल्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे आर्वजुन येतात.अशी पुष्टी जोडत,३१ ऑगस्टलाही मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करणार असल्याचे जाहिर केले.
'त्या' पत्रानंतर आता भूमिका बदलली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांची भेट झाल्यानंतर ९ जूनला लिहिलेल्या पत्रात, सेनेने भाजप सोबत जुळवुन घ्यावे.या माझ्या त्यावेळच्या भावना होत्या. त्यानंतर खूप पाऊस पडून गेला,वादळे आली,आता ती बाब संपली.त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली,त्यामुळे आता तसे वाटत नसल्याचे सांगुन आ. सरनाईक यांनी कोलांटउडी मारली.