फॅक्ट ऑफ द केस' पाहून राणेंवर कारवाई होईल !

नाशिक पोलिस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना

    24-Aug-2021
Total Views | 361
dipak_1  H x W: 
 
 
नाशिक पोलिस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना


नाशिक : मुख्यमंत्री यांच्या कानाखाली लगवण्याच्या एकेरी शब्दात नारायण राणे यांनी वक्तव्य केल्याने अनेक तक्रारदारांच्या भावना दुखवले आहेत, त्यामुळे नाशिक पोलिस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.त्यामुळे राणे यांना अटक करुन न्यायालयीन पद्धतीने कारवाई करण्यात होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
 या सर्व प्रकराणांवरुन केंद्रीय मंत्र्याला अटकरण्यात येते का असा देखील प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत.राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही.
 
 
बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल, त्यानुसार कोणत्या कायद्या अंतर्गत राणेंवर कलम लावण्यात आलेले आहेत. हे पाहून न्यायालयीन पध्दतीने राणेंनवर कारवाई करण्यात येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं असं वक्तव्य नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121