मुंबई : मालाड पूर्व येथील एका केकच्या दुकानात केकमध्ये गांजा भरून उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये विकण्याचा प्रकार सुरू होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे (एनसीबी) धाड टाकून या बेकरीतील प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आला. केकमध्ये गांडा भरून त्याची नशा करणाऱ्यांची नवी शक्कल उघडकीस आली होती.
या प्रकरणी एलस्टोन फर्नांडिस, जगत चौरसिया आणि एका तरुणीला अटक केली आहे. त्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली. मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात धडक मोहीम हाती सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. तस्कर हे ड्रग्जसाठी नव्या शकला लढवत आहेत. ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने एनसीबी त्यावर लक्ष ठेवून आहे.