लक्षद्वीपच्या सुरक्षिततेसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2021   
Total Views |

laksha_1  H x W
 
 
श्रीलंकेचे कोलंबो हे बंदर आता पूर्णतः चीनने ताब्यात घेतले आहे. आज कोलंबो बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा स्वायत्त भाग बनलेला आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेला अजून धोका निर्माण झाला आहे. चीनला जगावर राज्य करायचे आहे. त्याकरिता ते लक्षद्वीप मिनिकॉयसारख्या बेटावर डोळा ठेवून आहेत. हे सर्व लक्षात घेऊन या द्वीपसमूहाच्या सुरक्षेचा विचार व्हायला हवाच. देशाच्या सार्वभौमत्वाशी कसल्याही प्रकारची तडजोड होऊ नये.
 
 
पाच हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले
 
 
दि. ७ मार्च रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्टगार्ड) जहाजांनी श्रीलंकेची एक मच्छीमार बोट पकडली. या बोटीमध्ये सहा मच्छीमार होते. ही बोट तपासल्यानंतर त्यामध्ये २०० किलो ‘हेरॉईन’ आणि ६० किलो ‘हशीस’ मिळाले. तसेच १८ मार्चलाही कोस्टगार्डने आणखी एक बोट ताब्यात घेतली. या बोटीतूनही तब्बल तीन हजार कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. याशिवाय पाच ‘एके ४७ रायफल’ आणि एक हजार ‘अ‍ॅम्युनिशन’ही या बोटीतून जप्त करण्यात आले. ही बोट श्रीलंकेहून आली होती व या बोटीतील १९ नाविकांना अटक करण्यात आली. श्रीलंकेचीच आणखी एक बोट पकडण्यात आली होती आणि त्यातूनसुद्धा एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि काही शस्त्रास्त्रेसुद्धा पकडण्यात आली होती. थोडक्यात, गेल्या काही महिन्यांमध्ये पकडल्या गेलेल्या ड्रग्जची किंमत ही पाच हजार कोटी रुपयांहून जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज यापूर्वी कधीही इतक्या कमी कालावधीत पकडले गेले नव्हते. आपण अमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराची तुलना, लक्षद्वीपच्या अर्थसंकल्पाबरोबर केल्यास दरवर्षी लक्षद्वीपचे बजेट हे १,३०० ते १,४०० कोटी रुपये इतके असते. याचाच अर्थ पकडलेले ड्रग्ज हे लक्षद्वीपच्या बजेटपेक्षा तिप्पट जास्त होते आणि ते केवळ पाच महिन्यांमध्ये पकडले गेले. याशिवाय हवाला, मनिलॉण्ड्रिंग हेही मोठ्या प्रमाणात सुरू असते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जितके अमली पदार्थ आपल्याकडून पकडले जातात, त्याहून कैकपटींनी अधिक किमतीचे अमली पदार्थ निसटून, नको त्या ठिकाणी जातात. यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.
 
 
लक्षद्वीप द्विपसमूह सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा
 
 
लक्षद्वीप हा भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून २०० ते ४४० किमी दूर असलेल्या बेटांचा समूह आहे. यामध्ये ३६ बेटे आहेत. यापैकी एक बेट आता पाण्याखाली गेल्यामुळे त्याची संख्या आता ३५ आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय समूह हा भारतातला सर्वांत लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ केवळ ३२ किमी एवढे आहे. भौगोलिकदृष्ट्या आकारमान लहान असले तरी लक्षद्वीप बेटे ही भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४ ते ६५ हजारांच्या घरात आहे. यातील ९० टक्के लोकसंख्या ही मुस्लीम समाजाची आहे. येथे काही समाजविरोधी तत्त्वे अमली पदार्थांची, सोन्याची, शस्त्रात्रांची तस्करी यामध्ये गुंतलेले आहेत. या बेटांवर अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे या गुन्हेगारांना पकडणे महत्त्वाचे होतेच. केरळच्या उग्रवादी मल्लपुरम भागाशी लक्षद्वीप बेटांचे लागेबांधे असल्यामुळे या बेटांवर देखील उग्रवाद वाढत आहे. लक्षद्वीप बेटांना निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले असल्याने पर्यटकांना याचे आकर्षण वाटत असले, तरी त्यांच्या आजूबाजूला अनेक बेकायदेशीर कारवाया होत असतात. या बेटांवरील गुंडगिरीला, अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुंडविरोधी कायदा आणण्यात आला. त्यानंतर लगेचच ट्विटरवर ‘सेव्ह लक्षद्वीप’ नावाचा एक ट्रेंड सुरू करण्यात आला. मालदिवमध्ये पर्यटन होऊ शकत असेल, तर अशाच प्रकारचे पर्यटन हे लक्षद्वीपमध्ये का होऊ नये? मात्र, याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले.
 
 
आंतरराष्ट्रीय ‘क्राईम सिंडिकेट्स’, ‘ऑर्गनाईज क्राईम ग्रुप’ना रोखणे गरजेचे
 
 
 
ही बेटे भारताकडे असल्यामुळे आपल्याला २० हजार चौरस किलोमीटर ‘टेरिटोरियल वॉटर’ आणि चार लाख चौरस किलोमीटरचा ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’ मिळतो. यामुळे या समुद्राचा प्रचंड आर्थिक फायदा मिळू शकतो. ही बेटे अशा ठिकाणी आहेत की, जेथून जगाचे समुद्री महामार्ग जातात. मध्य आशिया किंवा पर्शियन आखातातून ज्या तेलाच्या बोटी जगभरात जातात आणि अन्य व्यापार होतो, तो मालदिव आणि या बेटांमधून होत असतो. सध्या दक्षिण पूर्व आशियातली ‘क्राईम सिंडिकेट्स’, श्रीलंकेतले ‘क्राईम सिंडिकेट्स’ या मार्गावर प्रचंड प्रमाणात ड्रग्ज वाहतूक करून त्यांना मध्य आशियामध्ये पाठवत आहेत. त्यामधील अनेक ड्रग्ज हे लक्षद्वीपमध्येही येऊ शकतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय ‘क्राईम सिंडिकेट्स’ आणि ‘ऑर्गनाईज क्राईम ग्रुप’ना रोखणे अतिशय महत्त्वाचे आहे. या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा बिमोड करणे आवश्यक आहे. यासाठी भारताने गुप्तहेर माहितीवर आधारित असे ऑपरेशन लॉन्च करणे आवश्यक आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ‘ड्रग्ज ट्रॅफिकिंग’ आणि ‘आर्म्स ट्रॅफिकिंग’मध्ये आपली लक्षद्वीपची बेटे फसणार नाहीत. यासाठी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. या बेटांवरील काही नागरिक आंतरराष्ट्रीय जहाजांवर काम करतात. काही वेळा त्यांचा गैरवापरही केला जाऊ शकतो. यावरही आपल्याला लक्ष ठेवावे लागेल.
 
 
चाचेगिरीवरील नियंत्रणासाठी महत्त्वाची
 
 
लक्षद्वीप बेटे अन्य कारणांसाठीही महत्त्वाची आहेत. खासकरून ‘पायरसी कंट्रोल’ म्हणजेच चाचेगिरीवरील नियंत्रणासाठी. या भागामध्ये पूर्वी समुद्री चाचेगिरी मोठ्या प्रमाणावर होत होती. ती रोखण्यासाठीही या बेटांचे महत्त्व खूप आहे. आज जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील ग्लेशियर्स वितळत चालल्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. येणार्‍या काही वर्षांमध्ये लक्षद्वीपसारखी छोटी बेटे बुडण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु, जोपर्यंत ही बेटे राहण्यासाठी योग्य आहेत, तोपर्यंत या बेटांचा आपण वापर अरबी समुद्र आणि हिंदी महासागर येथील भारताच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी निश्चितच केला पाहिजे.
 
 
मालदीवमधल्या वाढणार्‍या उग्रवादावर लक्ष ठेवावे
 
 
७ मे रोजी मालदीवच्या राजधानीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्याचे तेथील संसदेचे सभापती आणि अत्यंत महत्त्वाचे राजकीय नेतृत्व मोहम्मद नशीद हे गंभीररीत्या जखमी. इतर चारजणही या बॉम्बस्फोटात जखमी झाली. हा स्फोट ‘इसिस’ने केला असावा. लक्षात असावे की, ‘इसिस’करिता लढण्याकरिता मालदीवमधून गेलेल्या युवकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये दरडोई सर्वात जास्त आहे. यामुळे मालदीवमधील वाढणार्‍या उग्रवादावर लक्ष ठेवावे लागेल. हाच उग्रवाद अतिशय जवळ असलेल्या भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहावर देखील पसरू शकतो. लक्षद्वीप मिनिकॉय बेटांमधल्या अनेक लोकांचे मालदीवमधल्या लोकांशी रोजीरोटीचे संबंध आहेत. कारण, मिनिकॉय बेट हे मालदिव द्वीपसमूहापासून केवळ ७० ते ८० किमी एवढेच दूर आहे. सद्यःस्थितीत या बेटांवर भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि आणि ‘इंडिया रिझर्व्ह बटालियन’ तैनात आहेत. वेळोवेळी या बेटांना असलेल्या धोक्यांवर लक्ष ठेवले गेले पाहिजे. श्रीलंकेचे कोलंबो हे बंदर आता पूर्णतः चीनने ताब्यात घेतले आहे. आज कोलंबो बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा स्वायत्त भाग बनलेला आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेला अजून धोका निर्माण झाला आहे. चीनला जगावर राज्य करायचे आहे. त्याकरिता ते लक्षद्वीप मिनिकॉयसारख्या बेटावर डोळा ठेवून आहेत. हे सर्व लक्षात घेऊन या द्वीपसमूहाच्या सुरक्षेचा विचार व्हायला हवाच. देशाच्या सार्वभौमत्वाशी कसल्याही प्रकारची तडजोड होऊ नये.
 
 
अजून काय करावे?
 
 
भारतीय लष्कराच्या निवृत्त होणार्‍या जवान आणि अधिकार्‍यांना महत्त्वाच्या ज्या बेटांवरती मनुष्यवस्ती नाही, तिथे प्रस्थापित केल्यास त्या बेटांचे रक्षण करणे सोपे होईल. नंतर गरज पडली तर आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. या जवानांचा वापर तिथे आपले कान आणि डोळे म्हणून करता येईल. अर्थातच याकरिता त्यांना जमीन, पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्या लागतील. चीनचा धोका लक्षात घेता येणार्‍या काळात भारतीय सैन्याची एक ‘टेरिटोरियल आर्मी’ बटालियन येथे तैनात केली जावी.
किनारी पोलीस स्थानके सशक्त केली जावीत. प्रत्येक प्रवेश व निकास ठिकाणांवर कडक पहारा ठेवला जावा. बेटांलगतच्या पाण्यात मान्सूनमध्ये गस्ती, जमिनीवरून किनारीक्षेत्रातील प्रत्येक बेटावरील मोक्याच्या जागांवर प्रस्थापित केलेल्या पहारा मनोर्‍यावरून, ‘शोअर वॉच सिस्टीम’ सुपूर्द करण्यात आलेल्या तटरक्षकदल/नौदल आणि स्थानिक किनारी पोलीसदल यांच्याकडून एकत्रित घालणे आवश्यक आहे.
 
 
लक्षद्वीप बेटांचा वापर, न बुडणारी विमानवाहू जहाजे म्हणून केला जावा. या तळांचे स्थान भारतीय मुख्य भूमीपासून सुमारे ३०० किमी दूर आहे. त्यामुळे विमानांना विस्तारित लढाऊ त्रिज्या प्राप्त होईल. तो लाभ करून घ्यावा. द्वीपप्रदेशातील सुरक्षेच्या पायाभूत सुविधा वाढवून सुरक्षा त्रुटी बुजविण्याची आवश्यकता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@