पेटते बंगाल (भाग ९); ‘अभाविप’ कार्यकर्त्याच्या मातापित्यांना करोना लस नाकारली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2021   
Total Views |
ttmmc_1  H x W:




पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या नवव्या भागात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना नाकारण्यात येणारी करोना लस आणि महिला कार्यकर्त्यांना खंडणी देऊन घरी राहण्याची वेळ आल्याची घटना जाणून घेणार आहोत.
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते नित्यानंद मिस्त्री यांच्या मातापित्यांना ते भाजप समर्थक आहेत, म्हणून करोना लसीची दुसरी मात्रा तेथील सरकारी रुग्णालयाने नाकारल्याचा प्रकार घडला आहे”, अभाविप केंद्रीय समितीचे सदस्य सुमन चंद्र दास यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना हा गंभीर प्रकार सांगितला.
 
 
 
प. बंगाल विधानसभेचा निकाल जाहिर झाल्यानंतर रा. स्व. संघ, भाजप आणि अभाविप कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या अभाविप कार्यकर्त्यांवर विद्यार्थी आंदोलनांदरम्यानची जुनी प्रकरणे पुन्हा काढून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे करोना लसीकरणामध्येही आता अभाविप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना डावलण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. त्याविषयी जादवपूर विद्यापीठातील पीएच.डी संशोधक आणि अभाविप केंद्रीय समितीचे सदस्य सुमन चंद्र दास यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.
 
 
 
राज्यातील सुंदरबन येथे नित्यानंद मिस्त्री हे अभाविप कार्यकर्ते राहतात. ते जादवपूर विद्यापीठात शिक्षण घेतात, त्यांचे आई वडील मात्र सुंदरबन येथेच राहतात. नित्यानंद हे अभाविपच्या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये सक्रिय होत. निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर नित्यानंद हे आपल्या गावी गेले होते, त्यावेळी त्यांच्या आई वडिलांना करोना लशीची दुसरी मात्रा घ्यायची होती. नित्यानंद मिस्त्री आपल्या आई वडिलांना घेऊन तेथील सरकारी रुग्णालयात गेले. मात्र, “तुम्ही भाजपचे समर्थक आहात, तुम्ही निवडणुकीत भाजपला मत दिले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला लस देणार नाही” अशी भूमिका तेथील लोकांनी घेतली आणि नित्यानंद व त्यांच्या आई वडिलांना तेथून हाकलून लावले. त्यामुळे अद्यापही मिस्त्री यांच्या आई वडिलांना करोना लशीची दुसरी मात्रा मिळू शकलेली नाही.
 
 
 
अभाविपच्या महिला कार्यकर्त्यांवर ते आणखी भयानक स्थिती ओढवल्याचे सुमन चंद्र दास यांनी सांगितले. ते म्हणाले, बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यामधल्या हावडा येथील अभाविप कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यापैकी तीन महिला कार्यकर्त्यांना गंभीर त्रास देण्यात आला. या तिन्ही कार्यकर्त्या अभाविपच्या कामामध्ये सक्रिय आहेत. निवडणुकीदरम्यान अभाविपच्या मतदार जनजागरण मोहिमेतही त्यांनी सहभाग घेऊन तृणमूल राजवटीतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला होता. निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला, ८ ते १० गावठी बॉम्बचा मारा केला. त्यानंतर “यापुढे अभाविपचे काम केले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुमच्यावर बलात्कार करू” अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यानंतर आपला जीव वाचविण्यासाठी या कार्यकर्त्या सुरक्षित जागी आश्रयार्थ गेल्या. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घरी परतल्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खंडणी देऊन त्यांना रहावे लागत आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या काळात हिंदूंना जिझीया कर द्यावा लागत असे, तसाच कर आता अभाविप कार्यकर्त्या तृणमूल काँग्रेसला देत असल्याचे सुमन चंद्र दास यांनी सांगितले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@