
भाजपकडून कौल आणि पत्रे असलेला ट्रक कोकणवासीयांच्या मदतीसाठी रवाना
मुंबई : तौत्के चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांत त्यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त कोकणवासियांशी संवाद साधला. हा आढावा घेताच भाजपकडून कोकणवासीयांची मदतकार्य करण्यास सुरुवात झाली आहे.
वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, कौल उडून गेले. अशा कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजपने पुढाकार घेत कौल आणि पत्रे असलेला पहिला ट्रक कोकणवासीयांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, 'आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो ! कोकणात अनेक कुटुंबाच्या भेटी घेतल्या असता संवादादरम्यान लोकांनी आम्हाला सांगितले की, एक सामान्य समस्या आहे ती म्हणजे वादळामुळे आमच्या घरावरचे छत उडून गेली. त्यांची ही तातडीची गरज लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी तात्काळ कौल आणि पत्र्यांची व्यवस्था केली आणि आजपासून ते पुरविणे सुरू केले.
परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. फोटो शेअर करत ट्विट केले आहे की, "कोकणात आलेल्या #TauktaeCyclone मुळे अनेकांच्या घरांची कौले, छताचे पत्रे उडून गेले आहेत. अशा कुटुंबियांच्या सोबत आज भाजपा आणि नेते खंबीरपणे उभे आहेत. मा.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौले,पत्रे असलेला ट्रक कोकणवासीयांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आला." यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते रवींद्र चव्हाण, भाजप आमदार नितेश राणे, भाजप नेते राजन तेली उपस्थित होते.